लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीचा आढावा नागरिकांना वेळेत सेवा द्या; विलंब व दिरंगाई टाळा - राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे

 






लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीचा आढावा

नागरिकांना वेळेत सेवा द्या; विलंब व दिरंगाई टाळा

-        राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण  डोंगरे

अकोला, दि. २८ : शासनाच्या सेवा पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित पद्धतीने मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर हक्क आहे. त्यानुसार नागरिकांना वेळेत सेवा द्यावी व दिरंगाई टाळावी. प्रत्येकाने आपले उत्तरदायित्व जाणून कार्यवाही करण्याचे निर्देश अमरावती विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांनी आज येथे दिले.

 

लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अकोला जिल्ह्यातील अंमलबजावणीचा आढावा राज्य सेवा हक्क आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर,पोलिस अधीक्षक अर्चित चांडक ,अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे,मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांच्यासह सर्व यंत्रणाप्रमुख उपस्थित होते.

राज्य सेवा हक्क आयुक्त श्री. डोंगरे म्हणाले की, कायद्यानुसार नागरिकांना विहित कालमर्यादेत शासकीय विभागांच्या अधिसूचित सेवा मिळणे आवश्यक आहे. लोकसेवा हक्क कायदा सर्व शासकीय सेवा देणाऱ्या विभागांसाठी लागू असून, विहित कालावधीत सेवा पुरविण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे, त्यानुसार कालमर्यादेत सेवा पुरवावी. प्रत्येक सोमवारी लोकसेवा हक्क अधिनियमाचा डॅशबोर्ड तपासावा. कुठलेही प्रकरण प्रलंबित ठेवू नये, असे निर्देश त्यांनी दिले. माहिती व तंत्रज्ञानाने अनेक महत्वपूर्ण बदल घडून आले. त्याचा लाभ घेऊन प्रशासन अधिकाधिक पारदर्शक व गतिमान करण्याचे आवाहन त्यांनी केले.  

जिल्हा प्रशासनाने राबविलेला ई-भूमिती, तसेच ‘स्विफ्ट अकोला’ हा डिजिटल पडताळणी उपक्रम उपयुक्त असल्याचे सांगून त्यांनी या उपक्रमांचे कौतुक केले.

 ०००

 

 

 

 

 

 

 

टिप्पण्या

  1. सरकार गुंडाराज को सपोर्ट कर रही है,, अकोला जिला प्रशासन पुलिस जिले के अंदर अवैध काला बाजारी शराब विक्री करने वाले सौदागरों को सपोर्ट कर रही है,,,यह कहना गलत नहीं होगा,,, क्योंकि अकोला जिले के अंदर अपराधिक मामले थमने का नाम नहीं ले रहे,,शराब विक्री करने वाले सौदागरों ने तस्करों ने धूमाकुड मचाया है

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा