वृत्त विशेष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

 वृत्त विशेष

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६


जिल्ह्यातील ६३ हजार ८८८ कर्ज खात्यांची माहिती अपलोड

आधार व अग्रीस्टॅक नोंदणी करून घेण्याचे आवाहन

अकोला, दि. २२ : अकोला जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' च्या प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणीसाठी सुरवात झाली आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अकोला जिल्ह्यातील खातेदारांची माहिती अपलोड करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला असून आजवर जिल्ह्यातील ६३ हजार ८८८ खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड झाली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक रितेशचंद्र साबळे यांनी दिली.

यामध्ये अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २९ हजार ८९६ खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे तर राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांतर्फे ३३ हजार ९९२ खातेदारांची माहिती अपलोड केलेली आहे.
बँक ऑफ बडोदा (BOB) तर्फे १३०७, बँक ऑफ इंडीया (BOI) - ६९, बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) - ५६७८, केनरा बँक (CANARA) - ७५७, सेंट्रल बँक ऑफ इंडीया (CBI)-९५९९, इंडीयन बँक (INDIAN) - ८५८, इंडीयन ओव्हरसीज बँक (IOB) -१५४, पंजाब नॅशनल बँक (PNB)-५१, युनियन बँक ऑफ इंडीया (UBI)-३३०३, आय सी आय सी आय बँक (ICICI)-२५१, महाराष्ट्र ग्रामीण बँक (MGB)-११९६५, असे एकूण ३३ हजार ९९२ खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
शेतकरी बांधवांना कर्जाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी नियोजनामुळे कर्जमुक्तीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उर्वरित अल्प कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, यामुळे पात्र शेतकऱ्यांना लवकरच कर्जमुक्तीचा मोठा दिलासा मिळणार आहे. संबंधित जिल्हास्तरीय समितीच्या देखरेखीखाली आणि बँकेच्या गतीमान कार्यामुळे ही योजना विभागातील शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरणार आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक व अग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आवश्यक आहे. तरी अकोला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार क्रमांक जोडणी व अग्रीस्टॅक नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना