कावड उत्सव नियोजनाबाबत नियोजनभवनात बैठक_ कावड मार्गावर भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारा* *जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे निर्देश*
कावड उत्सव नियोजनाबाबत नियोजनभवनात बैठक_
*कावड मार्गावर भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारा*
*जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे निर्देश*
अकोला दि १६: देशभरात नावलौकिक मिळवलेला कावड उत्सव श्रावण महिन्यात साजरा होत असून या लोकोत्सवादरम्यान कावड यात्रेच्या मार्गावर पथदिवे, पिण्याचे पाणी ,स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके व आवश्यक सुविधा उभाराव्यात. सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करीत कावड उत्सव मंगलमय व उत्साहपूर्ण वातावरण पार पाडावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.
कावड यात्रा नियोजनाबाबत विविध कावड मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांच्या अध्यक्षतेत नियोजनभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर,महापालिका आयुक्त सुनील लहाने, सा. पालखी व कावड उत्सव समिती चे अध्यक्ष राजेश भारती,शिवभक्त मंडळ चे अध्यक्ष सुनील गरड, शा स अध्यक्ष पप्पू मोरवाल कार्याध्यक्ष तरुण बघेरे, विठ्ठल गाडे, राजू बुंदेले, विजय जामनिक, दिलीप नायसे, संतोष पांडे, गोपाल नागपुरे,
अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कावड मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्रीमती मीना म्हणाल्या की, अकोल्यातील कावड उत्सवाला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे हा उत्सव संपूर्ण राज्याचा गौरव वाढवणारा असून उत्सवा दरम्यान कावड मार्गांवर सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे व
जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे.कावड मार्गावर शिवभक्तांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार असून वैद्यकीय कक्ष कार्यरत राहणार आहेत.यासह अकोट मार्गावरून जलाभिषेक साठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी पुरेशा व्यवस्था करण्यात येणार असून श्रावण महिन्यातील कावड पालखी उत्सव, व धारगड येथील यात्रा दरम्यान सर्व विभागांनी आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात, गांधीग्राम येथील घाटावरील कामे त्वरित पूर्ण करावी
मनपा आयुक्त श्री.लहाने म्हणाले की संपूर्ण कावड आरोग्य, अग्निशमन, वीज, पाणीपुरवठा तसेच अन्य आपत्कालीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
जि प मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.नावंदर म्हणाले की कावड उत्सव काळामध्ये मनपा क्षेत्रात १० रुग्णवाहिका व १० आरोग्य पथके, अकोट मार्गावर पाच रुग्णवाहिका व आरोग्य पथके तसेच धारगड यात्रेसाठी आरोग्य पथके पूर्ण वेळ कार्यरत राहणार आहेत.
पोलीस अधीक्षक श्री चांडक म्हणाले की, कावड उत्सव दरम्यान प्रत्येक कावड मंडळासाठी २४ तास पोलीस पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे.उत्सवा दरम्यान गांधीग्राम येथे येणाऱ्या शिवभक्तांसाठी उपहारगृह व पिण्याच्या पाण्याची दुकाने खुली राहतील, पार्किंग व्यवस्था करण्यासंदर्भात प्रशासनाकडून आवश्यक ती कारवाई केली जाईल, उत्सवा दरम्यान सर्व शिवभक्तांनी सामंजस्याने कार्य करावे लेझर लाईटचा कुठेही वापर होऊ नये याची काळजी घ्यावी.. महिला कावड उत्सवासाठी महिला पोलीस पथक कार्यरत राहणार आहेत.
यावेळी कावड उत्सव मंडळातील पदाधिकारी शिवभक्त यांनी विविध सूचना मांडल्या
..
श्रावण महिन्यात १७ ऑगस्ट रोजी पहिला श्रावण सोमवार, २४ ऑगस्ट रोजी दुसरा श्रावण सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी तिसरा श्रावण सोमवार (श्री क्षेत्र धारगड यात्रा) तसेच ७ सप्टेंबर रोजी चौथा श्रावण सोमवार असून या दिवशी अकोला शहर व ग्रामीण भागात कावड व पालखी मिरवणुका निघणार आहेत. या कालावधीत मोठ्या संख्येने शिवभक्त गांधीग्राम येथील पूर्णा नदी पात्राजवळ एकत्र येतात. मध्यरात्रीनंतर कावडधारी पूर्णा नदीचे पवित्र जल कावडीत भरून अकोला शहरातील श्री राजराजेश्वर मंदिरात नेऊन भगवान महादेवांच्या पिंडीवर जलाभिषेक करतात.
कावड मिरवणुकीचा मार्ग आपातापा नाका, रेल्वे पूल, शिवाजी महाविद्यालय, अकोट स्टॅण्ड, मामा बेकरी, बीयानी चौक, कपडा बाजार, सराफा लाईन, गांधी चौक, कोतवाली चौक, लोखंडी पूल, काळा मारोती टर्न, जय हिंद चौक ते श्री राजराजेश्वर मंदिर असा राहणार आहे.





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा