पीएम यशस्वी टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल शिष्यवृत्ती योजना अर्ज करण्याचे आवाहन

 

 

 

पीएम यशस्वी  टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल शिष्यवृत्ती योजना

अर्ज करण्याचे आवाहन

अकोला दि. 6 : केंद्राच्या सामाजिक न्याय विभागातर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणा-या गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पीएम यशस्वी  टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल शिष्यवृत्ती योजना राबवली जात आहे.

 त्यात इयत्ता ९ वी ते ११ वी वर्गात शिकणा-या व पालकांचे उत्पन्न एकुण अडीच लाखांहून कमी असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज शिष्यवृत्ती मिळण्याकरिता नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर https://scholarships.gov.in मागविण्यात आले आहेत.

अकोला जिल्ह्यातील २०१ शाळांची व ८७ कनिष्ठ महाविद्यालय योजनेसाठी निवड करण्यात आली असुन ३१ ऑक्टोबरपूर्वी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे

योजनेत इयत्ता ९ वी ते १० वी वर्गात शिकणा-या विद्यार्थ्यांना वार्षिक ७५ हजार आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रू. आर्थिक मदत दिली जाणार आहे. अर्जासोबत जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आधारपत्र, गुणपत्रक, शाळा प्रवेश प्रमाणपत्र, बँक खात्याचे तपशील आणि पासपोर्ट आकारातील छायाचित्र अपलोड करणे अनिवार्य आहे. पात्र विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज करुन सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक अभिजित काळे यांनी केले.

०००

 

 

 

 

 

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा