मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेत अर्ज करण्याचे आवाहन

अकोला दि. 22 : मत्स्यव्यवसाय विभागाच्या माध्यमातून राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी "मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना” सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही योजना मच्छीमार, मत्स्यपालक, शेतकरी आणि संबंधित उद्योजकांना आर्थिक, तांत्रिक व संरचनात्मक सहाय्य प्रदान करणारी सर्वसमावेशक योजना आहे. याबाबत दि.९ मार्च २०२६ रोजी या संदर्भात शासन निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यतील तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासोबतच मच्छिमारांना योजनेतील विविध घटकाद्वारे अनुदान दिले जाणार आहे.
"विकसित महाराष्ट्र २०४७" चे ध्येय गाठण्यासाठी सदर योजना मैलाचा दगड ठरणार आहे. या अंतर्गत ६ राज्यस्तरीय आणि १९ जिल्हा स्तरीय योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे तसेच ३ जिल्हास्तरीय योजनांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील मत्स्यपालक, मच्छीमार व इच्छुक लाभार्थीनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, दुसरा मजला, भूविकास बँक, जुने पोलीस अधीक्षक कार्यालयाशेजारी अकोला येथे संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय अकोला यांनी आवाहन केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा