बीएलओंना परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करा मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार यांचे आवाहन
बीएलओंना परिपूर्ण माहिती देऊन
सहकार्य करा
मतदार नोंदणी अधिकारी
तथा उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार यांचे आवाहन
अकोला, दि. ३०
: 'विशेष सखोल पुनरिक्षण' कार्यक्रमात नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याबरोबरच नावातील
चूक दुरूस्त करणे, मयत/स्थलांतरित व्यक्तीची नावे वगळणे यासारखी महत्त्वाची कामे केली
जात आहेत. त्यामुळे तपशीलात विसंगती आढळली तर चिंतेचे कारण नाही. बीएलओंना योग्य माहिती
देऊन यादी निर्दोष करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी
निखिल खेमनार यांनी केले.
तफावत/विसंगती म्हणजे काय?
मतदार यादीतील
डेटाची 2002-2004 च्या जुन्या मतदार डेटाशी तुलना करताना सिस्टीमद्वारे काही लॉजिकल
विसंगती शोधल्या जातात, त्यालाच तफावत/विसंगती
असे म्हणतात.
प्रामुख्याने खालील
बाबी यात येतात
नावातील स्पेलिंगच्या
चुकाः- जुन्या रेकॉर्ड आणि सध्याच्या माहितीत नावाचे स्पेलिंग वेगळे असणे.
वय आणि नातेसंबंधातील
तफावतः आई-वडील आणि अपत्याच्या वयात अस्वाभाविक अंतर असणे (उदा. 15 वर्षापेक्षा कमी
किंवा 45 वर्षापेक्षा जास्त फरक
एकाच नावाचे एकापेक्षा
जास्त मतदारः एकाच मतदारसंघात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी एकाच व्यक्तीची दोन ठिकाणी नोंद
असणे (Duplicate Voters).
एकाच व्यक्तीशी
अनेक मतदार जोडलेले असणे:- एकाच पूर्वजासोबत 6 पेक्षा जास्त मतदार जोडलेले असणे.
अपूर्ण माहिती:-
फॉर्ममध्ये वडिलांचे नाव नसणे, पत्ता अपूर्ण असणे किंवा लिंग आणि नावात तफावत असणे.
अशा तफावत/विसंगतीबाबत
नागरिकांनी घाबरायची आवश्यकता नाही, तफावत/विसंगती आल्यामुळे किंवा नो मॅपिंग असल्यामुळे
आपले नाव प्रारुप मतदार यादीतून वगळले जाणार नाही. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्या
घरी येणारे बीएलओ (BLO) हे शासन नियुक्त कर्मचारी असुन त्यांनी विचारलेली माहिती देणे
हे प्रत्येक नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.
कागदपत्रांसह संबंधित
बीएलओ यांच्याशी भेट घेऊन आपले मॅपिंग करून घ्यावे. नागरिकांकडून घेतली जाणारी माहिती
पूर्णपणे सुरक्षित असून तो केवळ निवडणूक प्रक्रियेसाठीच वापरली जाईल. कृपया बीएलओ यांना
आपले ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड) आणि कुटुंबाची योग्य माहिती देऊन सहकार्य
करावे, नागरिकांनी आपली किंवा कुटुंबाची योग्य माहिती न दिल्यास अथवा टाळाटाळ केल्यास,
कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून सदर मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ शकते. माहिती
देण्यास टाळाटाळ करणे किंवा चुकीची माहिती देणे हे निवडणूक नियमांनुसार अडथळा ठरू शकते.
त्यामुळे परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा