गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी केंद्रीय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया जाहीर

 गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी

 केंद्रीय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया जाहीर

अकोला, दि. १३ : :येथील केंद्रीय विद्यालय येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वीच्या वर्गातील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

स्थानिक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी यानिमित्त निर्माण झाली असून, इच्छुकांनी वेळेत अर्ज करून संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासन व केंद्रीय विद्यालय समितीतर्फे करण्यात आले आहे.
 या प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती
नोंदणी फॉर्म मिळणे आणि सादर करणे यासाठी १५ जुलै ते २८ जुलै अशी मुदत असून (फक्त कामकाजाच्या दिवशी) फॉर्म स्वीकारण्याची वेळ सकाळी ९ ते दुपारी १२:३० आणि दुपारी १:०० ते २:३० वाजेपर्यंत अशी आहे.

फॉर्म सादर करण्याची अंतिम तारीख २८ जुलै आहे.प्रवेशाची सोडत ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता 'जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला' येथे होईल.

निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी ३ ऑगस्ट २०२६ रोजी लॉटरी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल.

प्रवेशाचे ठिकाण केंद्रीय विद्यालय अकोला, जिल्हा परिषद हायस्कूल (शहर), हरिहर पेठ, अकोला - ४४४००२ हे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य बालाजी मारकवार यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना