स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

 




 

 स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

अकोला, दि. ३० : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वा. मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. त्याअनुषंगाने संबंधित सर्व विभागांनी आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, तहसीलदार कुणाल झाल्टे, सा. बां. वि. कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, समारंभाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता, सुशोभीकरण, आवश्यक दुरूस्त्या वेळेत पूर्ण करून घ्याव्यात. शासकीय इमारतींवर आकर्षक रोषणाई व परिसर स्वच्छ ठेवा. शालेय शिक्षण विभागामार्फत विविध स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन व्हावे. मुख्य कार्यक्रमाच्या दृष्टीने पथकांचा आवश्यक सराव व्हावा. उपस्थितांसाठी कार्यक्रम स्थळी बैठक व्यवस्था, पेयजल, वैद्यकीय पथक, इतर सुविधा ठेवाव्यात.  मुख्य कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा