शासकीय मूकबधीर विद्यालयात प्रवेश सुरू
शासकीय मूकबधीर विद्यालयात प्रवेश सुरू
अकोला, दि. 6 : येथील मलकापूर परिसरातील शासकीय मूकबधीर विद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
संस्थेत इयत्ता पहिली ते सातवीदरम्यान मुलांना प्रवेश मिळेल. वयोमर्यादा ६ ते १६ वर्षे. विद्यार्थी कर्णबधीर असावा. जिल्हा शल्यचिकित्सकाचे ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असावे. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. संस्थेत प्रवेश विनामूल्य असून, निवास, भोजन, अंथरूण-पांघरूण, शालेय साहित्य व इतर आवश्यक सुविधा विनामूल्य मिळतील.
गरजूंनी दि. ३१ जुलैपूर्वी दिव्यांग सक्षमीकरण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे किंवा शासकीय मूकबधीर विद्यालय, महसूल वसाहत, सिद्धेश्वर देऊळ परिसर, मलकापूर, अकोला येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी संपर्क : 9028395441 किंवा 9850779260.
000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा