जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान केंद्राचा अंदाज
जिल्ह्यात पावसाची शक्यता
हवामान केंद्राचा अंदाज
अकोला, दि. 6 : जिल्ह्यात दि.6 जुलै ते 8 जुलैपर्यंत काही
ठिकाणी विजाच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने
वर्तवली आहे. यादरम्यान ताशी 40 ते 50 किमी प्रतितास याप्रमाणे हवेचा वेग राहण्याची
शक्यता आहे. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटांसह विजा आणि पाऊस पडण्याची
शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अशावेळी आवश्यक ते कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नका,
जनावरांना झाडांना किंवा विजेच्या तारेच्या खाली बांधू नका. विज, वारा व पावसापासून
बचावाकरीता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. अशास्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये.
पाऊस व विजाच्या स्थितीत मोबाईल फोनचा उपयोग टाळावा. सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता
घेण्याच्या सुचना देण्यात आले आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा