जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान केंद्राचा अंदाज

 


जिल्ह्यात पावसाची शक्यता

हवामान केंद्राचा अंदाज

अकोला, दि. २८ : जिल्ह्यात दि.२८ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पाऊस, तसेच अतिवृष्टी होण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे.

या काळात आवश्यक ते कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, जनावरांना झाडांना किंवा विजेच्या तारेच्या खाली बांधू नका. विज, वारा व पावसापासून बचावाकरीता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. अशास्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. पाऊस व विजाच्या स्थितीत मोबाईल फोनचा उपयोग टाळावा. सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आले आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना