रोजगार मेळाव्यातुन निवड झालेल्या ६६ उमेदवारांना ऑफर लेटरचे वितरण
रोजगार मेळाव्यातुन निवड झालेल्या ६६ उमेदवारांना ऑफर लेटरचे वितरण
अकोला, दि. २२ जुलै : जिल्हा रोजगार मेळावा समन्वय समिती मार्फत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ऑफर लेटर वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
अकोला जिल्हा रोजगार मेळावा समन्वय समितीमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त
महिला व बाल विकास भवन, अकोला येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य रोजगार मेळावा समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील होते. कार्यक्रमाचे उद्घाटक अनंत केदारे, अकोला जिल्हा रोजगार मेळावा समन्वय समिती यांच्या हस्ते झाले. यावेळी समिती सदस्य महेन्द्र कवीश्वर, सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके, नागेश देशपांडे, कौशल्य विकास अधिकारी, श्रीमती पूनम रजाने, कौशल्य विकास अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल शेळके सहाय्यक आयुक्त, संचालन श्रीमती सोनाली भोगे तर आभार प्रदर्शन श्री.प्रविण बांबोळे कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी,यांनी केले
या प्रसंगी विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झालेल्या 66 उमेदवारांना ऑफर लेटरचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी युवक-युवतींना रोजगाराच्या संधींचा लाभ घेऊन कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वावलंबी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, रोजगार मेळावा समन्वय समितीचे पदाधिकारी, उमेदवार व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा