कुटुंबनिवृत्तवेतनधारकांसाठी पेंशन अदालत

 

 

कुटुंबनिवृत्तवेतनधारकांसाठी पेंशन अदालत

अकोला दि. 29  : कुटुंबनिवृत्तवेतनधारकांसाठी पेंशन अदालत दि.11 ऑगस्ट रोजी 11 वाजता प्रवर अधिक्षक टपाल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

निवृत्तवेतनधारकांच्या लाभांशी संबंधित तक्रारी जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत/ ज्यांची सेवेत असताना मृत्यू झाला आहे, टपाल विभाग, अकोला व वाशिम जिल्ह्याचे निवृत्तीधारक ज्यांच्या तक्रारींची 3 महिन्यांचे आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा टपाल पेंशन न्यायालयामध्ये विचार केला जाईल.

पेंशन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्द्यांसह प्रकरणे, ई- वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेशन, टीबीओपी / एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी. च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. निवृत्तवेतनधारकांनी आपला अर्ज विहित नमुन्यात प्रवर अधिक्षक डाकघर, अकोला विभाग, सिविल लाइन्स, अकोला-444001 या पत्यावर दि. 3 ऑगस्टपूर्वी समक्ष अथवा पोस्टाने पाठवावा. त्यानंतर मिळालेल्या अर्जावर पेंशन अदालतीत विचार करण्यात येणार नाही.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना