'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' कार्यक्रमात कामगारमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांची विशेष मुलाखत

       


 कामगार हित, नवीन कामगार नियमावली आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा

'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' कार्यक्रमात

कामगारमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांची विशेष मुलाखत

 

मुंबई, दि. २९ : राज्यातील कामगारांचे हक्क, सुरक्षितता, सामाजिक संरक्षण आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधत महाराष्ट्राला अधिक कामगारहितैषी व उद्योगस्नेही राज्य बनविण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांचा वेध घेणारी कामगारमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' या लोकप्रिय कार्यक्रमांमधून प्रसारित करण्यात येणार आहे.

 

'कामगार हित, नवीन कामगार नियमावली आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा' या विषयावरील या विशेष संवादामध्ये नवीन कामगार नियमावलीची अंमलबजावणी, कामगार कल्याणकारी योजनांचा विस्तार, बांधकाम कामगारांचे कल्याण, गिग वर्कर्सचे सामाजिक संरक्षण, महिला कामगारांचे सक्षमीकरण, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणारे उपाय, वेतन प्रक्रियेतील पारदर्शकता, उद्योगस्नेही वातावरण निर्मिती तसेच राज्य शासनाच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती मंत्री ॲड. आकाश फुंडकर 'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.

 

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, ४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही उपलब्ध होणार आहे.

 

याचबरोबर 'दिलखुलास' कार्यक्रमात ही मुलाखत ४, ५ आणि ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच 'News on AIR' या ॲपवरून प्रसारित करण्यात येणार आहे.

 

महासंचालनालयाची अधिकृत समाजमाध्यमे :

• X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

• Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

• YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

 

कामगारांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणे, सुरक्षित व सन्मानजनक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, सामाजिक संरक्षण अधिक प्रभावी करणे आणि उद्योग विकासाला आवश्यक असे सक्षम, पारदर्शक व विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर ही विशेष मुलाखत कामगार, उद्योग क्षेत्र, नियोक्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी मार्गदर्शक आणि माहितीपूर्ण ठरणार आहे.

0000



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना