मतदार नोंदणीच्या कामात कसूर खपवून घेणार नाही जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा विनापरवानगी रजा विनावेतन करणार
मतदार नोंदणीच्या कामात कसूर खपवून घेणार नाही
जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा
विनापरवानगी रजा विनावेतन करणार
अकोला, दि. ६ : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने सध्या विशेष
मतदार नोंदणीचा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम राबविला जात आहे. हे काम विहीत कालमर्यादेत
पूर्ण करण्याचे आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता परस्पर
रजेवर गेल्यास कडक कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिला
आहे.
निवडणूक आयोगाच्या कामाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. मतदार
नोंदणीच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी सर्व क्षेत्रीय आणि संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यालयात
उपस्थित राहणे अनिवार्य आहे. त्यामुळे २९ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय
संबंधित कोणत्याही अधिकाऱ्याला रजा घेता येणार नाही आणि मुख्यालयही सोडता येणार नाही.
हा आदेश डावलून जर कोणी अधिकारी परस्पर रजेवर गेला,
तर त्याची ती रजा 'विनावेतन' केली जाणार आहे. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र
नागरी सेवा नियमांतर्गत कडक शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल
ज्या अधिकाऱ्यांची २९ जुलै २०२६ पर्यंतची रजा यापूर्वी
मंजूर करण्यात आली होती, ती रजा देखील तातडीने नामंजूर (रद्द) करून त्यांना कामावर
हजर करून घेण्याचे आदेश नियमानुसार देण्यात आले आहेत.
हे आदेश अकोला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार,
मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, तसेच मतदार नोंदणीशी संबंधित सर्व अधिसूचित अधिकाऱ्यांना
देण्यात आले आहेत.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा