शिबिरांद्वारे जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप

  

शिबिरांद्वारे जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप

अकोल दि. 6 : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राजर्षी शाहु महाराज जयंती पर्वअंतर्गत विशेष त्रुटी पुर्तता शिबीरे घेण्यात आली. त्यात ३०० जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन प्रणालीव्दारे वितरीत करण्यात आले आहे.

विशेष मोहिमेअंतर्गत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. सदर वेबिनारमध्ये जात वैधता प्रमाणपत्रसाठी अर्ज करण्याची संपुर्ण प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे, तसेच अर्ज करताना येणा-या अडचणी व शंकांचे तज्ज्ञांमार्फत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. उच्च शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम यांच्या नव्या प्रवेशितांसाठी विशेष खिडकीचे नियोजन करण्यात आले होते. समितीचे अध्यक्ष जितेंद्र काकुस्ते, उपायुक्त अमोल यावलीकर, सदस्य सचिव मनोज मेरत यांनी काम पाहिले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा