मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ फॉर्म वितरण, संकलन व डिजिटायझेशनाचे काम वेगात

 मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६


 फॉर्म वितरण, संकलन व डिजिटायझेशनाचे काम वेगात

अकोला, दि. १७ : भारत निवडणूक आयोगाने दिनांक १४.०५.२०२६ रोजी घोषित केलेल्‍या मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision- SIR) कार्यक्रमाची अंमलबजावणी अकोला जिल्‍हयामध्‍ये सुरु आहे. सदर कार्यक्रमाच्‍या वेळापत्रकानूसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बिएलओ) हे  ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत घरोघरी भेट देऊन अंशत: भरलेले गणना पत्र (Enumeration Form) प्रत्येकी दोन प्रतीत मतदारांना वितरित करत आहेत व माहिती भरलेली गणनापत्रकांची प्रत परत घेत आहेत.


अकोला जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदार संघातील एकुण १७४१ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बिएलओ) यांचेकडून १५,९५,६४४ मतदाराची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येत असून दिनांक १७.०७.२०२६ पर्यत मतदारांना वाटप केलेले गणना पत्रक व डिजिटायझेशन केलेले गणनापत्रकाची माहिती खालील प्रमाणे आहे.
विधानसभा मतदार संघाचे नाव
एकूण मतदार
गणना पत्र
 (Enumeration Form)
वाटपाची टक्‍केवारी
गणना पत्र
 (Enumeration Form)
डिजिटायझेशनची टक्‍केवारी

२८-अकोट
३०६९१२
९९.९२
५२.५८

२९-बाळापूर
३०७८५४
९९.२३
४६.३५

३०-अकोला (पश्चिम)
३३३५६१
७९.६२
२३.३७

३१-अकोला (पूर्व)
३५०१९३
९८.६७
४९.५६

३२-मुर्तिजापूर (अजा)
२९७१२४
९८.७५
६६.०२

ए‍कूण
१५९५६४४
९५.०५
४७.११

मतदार मागील विशेष सखोल पुनरिक्षणामधील मतदार यादीतील स्‍वतःचे/संबंधित नातेवाईकांचे नाव ECINet हे अॅप्‍लीकेशन गुगल प्‍लेस्‍टोअर वरुन डाऊनलोड करुन तसेच https://voters.eci.gov.in या संकेतस्‍थळावर तपासू शकतात आणि गणना पत्रातील माहितीची पडताळणी करुन दोन्ही प्रती मध्ये योग्य माहिती भरुन आणि स्वाक्षरी करुन गणना पत्राची एक प्रत आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बिएलओ) यांचेकडे जमा करावी.
मतदारांस आपले गणना प्रपत्र ECINet हे अॅप्‍लीकेशन गुगल प्‍लेस्‍टोअर वरुन डाऊनलोड करुन तसेच https://voters.eci.gov.in  या संकेतस्‍थळावरुन ऑनलाईन पध्दतीने ही भरता येईल.
सर्व मतदारांना त्‍यांचे छायाचित्र गणना पत्रकावर चिकटवणे आवश्‍यक नाही, ज्‍या मतदारांचा मतदार यादीमध्‍ये फोटो अस्‍पष्‍ट आहे अथवा योग्‍य त्‍या आकारामध्‍ये नाही, अशा मतदारांचा फोटो मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी हे त्‍यांचे मोबाईल मध्‍ये फोटो काढतील यामध्‍ये काही तांत्रिक अडचण उद्दभवल्‍यासच  मतदारांना त्‍यांच्‍या फोटोची प्रत गणना पत्रकावर (Enumeration Form) वर चिकटवणे आश्‍यक राहील.    
विशेष सखोल पुनरिक्षण कालावधीमध्‍ये नागरिकांना माहिती देण्‍यासाठी त्‍याप्रमाणे त्‍याच्‍या अडचणींचे निराकरण करण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हा व्‍यवस्‍थापन व सनियंत्रण कक्ष (वॉररुम) दुसरा मजला, जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला ची स्‍थापना करण्‍यात आली आहे. येथे मतदार प्रत्‍यक्ष भेट देवून आपल्‍या समस्‍याचे निराकरण करुन घेऊ शकतील.
तसेच विशेष सखोल पुनरिक्षण कालावधीमध्‍ये नागरिकांना माहिती देण्‍यासाठी त्‍याप्रमाणे त्‍याच्‍या अडचणींचे निराकरण करण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरावर मदत कक्षाची (Help Desk) स्‍थापना करण्‍यात आली आहे. त्‍याकरीता टोल फ्री असलेला १९५० तसेच ९१८०६५९०९८४४ हा दुरध्‍वनी क्रमांक कार्यन्वित करण्‍यात आला आहे. हे क्रमांक मतदार यादीच्‍या अंतिम प्रसिध्‍दीपर्यत सकाळी ६.०० पासून ते रात्री १०.०० वाजेपर्यत कार्यरत राहतील.

जिल्‍हयातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये तसेच उपजिल्‍हाधिकारी (महसूल), जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांच्‍या ठिकाणी मदत कक्षा (Help Desk) ची स्‍थापना करण्‍यात आली आहे. त्‍यांचे क्रमांक खालील प्रमाणे आहेत.
विधानसभा मतदार संघाचे नाव
दुरध्‍वनी क्रमांक

२८-अकोट विधानसभा मतदार संघ
९४२०१४६६५९

२९-बाळापूर विधानसभा मतदार संघ
७७४१८४५९८८
९७६३८६६६९९

३०-अकोला(पश्चिम)विधानसभा मतदार संघ
८०१०३८४०१४

३१-अकोला(पूर्व)विधानसभा मतदार संघ
७७७४००७६०८

३२-मुर्तिजापूर(अजा)विधानसभा मतदार संघ
९५५२७१५४६२
८६९८२९५१७७

मा.भारत निवडणूक आयोगातर्फे मतदारासाठी मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी BLO ना कॉल करण्यासाठी Book a call  With BLO ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ECINET हे App download   करुन सदर अॅप मधील Book a call With BLO या सुविधेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येते.
करिता विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांमध्ये मतदारांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हानिवडणूक अधिकारी अकोला यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना