माय भारत पोर्टलवरील विशेष सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
माय भारत पोर्टलवरील विशेष सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविण्याचे
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
अकोला, दि. २२ : माय भारत पोर्टल वरील विशेष सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवा, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी येथे दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मेरा युवा भारत केंद्र (MY Bharat Kendra), अकोला जिल्हा सल्लागार समितीची बैठक सोमवारी झाली त्यावेळी त्या बोलत होत्या.
बैठकीत जिल्हा युवा अधिकारी अक्षय निपाणे
यांनी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, मेरा युवा भारतचे प्रमुख उपक्रम, युवकांसाठी उपलब्ध विविध संधी, मेरा युवा भारत (mybharat.gov.in) पोर्टलवरील विशेष सदस्य नोंदणी अभियानाची रूपरेषा तसेच आगामी जिल्हास्तरीय कृती आराखड्याचे सविस्तर सादरीकरण केले.
बैठकीस डॉ. ए. एल. कुलवाल, जिल्हा शल्यचिकित्सक, श्री. दिगंबर लोखंडे, अतिरिक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, डॉ. एस. आर. कोहचळे, जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. एस. एस. हाडोळे, जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, श्री. सतीशचंद्र भट्ट, जिल्हा क्रीडा अधिकारी, श्री. किरण लहाने, जिल्हा संघटक, भारत स्काऊटस आणि गाईड्स, कु. पूनम राजणे, कौशल्य विकास विभाग, श्री. प्रभजीत सिंह बघेर, मानद सचिव, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, श्री. अविनाश खंडारे, उद्योग निरीक्षक, जिल्हा उद्योग केंद्र, डॉ. एम. जे. देशमुख, विद्यार्थी कल्याण संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, श्री. विशाल राखोंडे, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते, श्री. मदन घेगटे, लेखा अधिकारी, मेरा युवा भारत केंद्र, अकोला, श्री. सागर चौधरी, कार्यालय सहाय्यक, मेरा युवा भारत केंद्र, अकोला तसेच आकाश गवई, स्वयंसेवक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी व अध्यक्षा, जिल्हा सल्लागार समिती यांनी मेरा युवा भारत पोर्टलवरील विशेष सदस्य नोंदणी अभियान जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, तरुणांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करावा तसेच प्रस्तावित कार्यक्रम व उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सक्रिय सहकार्य द्यावे, असे निर्देश दिले.

.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा