स्वाधार अर्जाची पूर्तता करण्याचे आवाहन

 स्वाधार अर्जाची पूर्तता करण्याचे आवाहन

अकोला, दि. 1 : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणुन भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत विद्यार्थ्यांच्या आधार संलंग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. स्वाधार योजनेंतर्गत काही विद्यार्थ्यांचे परिक्षेचे निकाल बाकी असल्यामुळे जे विद्यार्थी अर्ज सेंड बॅक करू शकले नाही असे विद्यार्थी सदर योजना लाभापासून वंचित राहणार नाहीत या करिता स्वाधार योजनेतील सेंट बॅक अर्जाची त्रुटीपूर्तता करणेकरिता दि.7 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी शैक्षणिक सत्र 2024-2025 व 2025-2026 करिता विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगीनमधील सेंट बॅक अर्जाची त्रुटीपूर्तता लवकरात लवकर करुन स्वाधार योजनेतील इन्सपेक्टर लेवल लॉगीन ला व कार्यालयात सादर करावी. या पत्राद्वारे देण्यात येणारी मुदत ही अंतीम असुन आपल्या लॉगीनमधील सेंट बॅक अर्जाची त्रुटीपूर्तता तात्काळ करण्यात यावी. जेणेकरुन विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ घेता येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना