प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 नामांकन अर्ज सादर करण्याचे आवाहन
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026
नामांकन अर्ज सादर करण्याचे आवाहन
अकोला, दि. ६ : केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयामार्फत "प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026" साठी नामांकन अर्ज मागविण्यात आले आहेत.
देशातील विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करून समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या बालकांचा गौरव करण्यासाठी हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
या पुरस्कारासाठी 31 जुलै 2026 रोजी 5 ते 18 वर्षे वयोगटातील भारतीय बालके पात्र आहेत. साहस, समाजसेवा, पर्यावरण संरक्षण, क्रीडा, कला व संस्कृती तसेच विज्ञान व तंत्रज्ञान या सहा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बालकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
या पुरस्कारासाठी बालक स्वतः, पालक, संस्था किंवा इतर व्यक्ती नामांकन सादर करू शकतात. सर्व अर्ज केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे.
इच्छुक बालके, पालक, शैक्षणिक संस्था तसेच संबंधितांनी अधिक माहितीसाठी "awards.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी व पात्र बालकांचे नामांकन वेळेत सादर करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे यांनी केले आहे.
000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा