वसंतराव नाईक वि. जा. भ. ज. विकास महामंडळाच्या योजना वि.जा. व भ. ज., विमाप्र प्रवर्गासाठी स्वयंरोजगार कर्ज योजना
वसंतराव नाईक वि. जा. भ. ज. विकास महामंडळाच्या योजना
वि.जा. व भ. ज., विमाप्र प्रवर्गासाठी स्वयंरोजगार कर्ज योजना
अकोला, दि. 30 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत
विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील लोकांकरिता योजना राबवल्या
जातात.
महामंडळाअंतर्गत राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, पैलवान कै.
मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ, श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ,ब्रम्हलीन
आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ,
श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ या सहा उपकंपन्यांमार्फत समाजातील
लोकांसाठी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कृषी संलग्न व्यवसाय, लघूउधोग, वाहतूक क्षेत्रातील
संबंधित व्यवसाय, तांत्रिक व्यवसाय पारंपारिक व्यवसाय, अथवा सेवा उद्योग सुरू करण्यासाठी
राष्ट्रीयकृत बँक व महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा
योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना सुरू आहे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत जास्तीत जास्त रु. १५ लाखापर्यंत
कर्ज पुरवठा करण्यात येतो व गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत रु. ५० लाखापर्यंत कर्ज
पुरवठा करण्यात येतो. सदर दोन्ही योजनामध्ये लाभार्थ्याला मुद्दल आणि व्याज बँकेत भरावयाची
आहे. त्यानंतर महामंडळ व्याजाची रक्कम १२ टक्क्यांपर्यंत लाभार्थ्यांच्या वैयक्तिक
खात्यात जमा करते. या योजनेच्या सर्व मार्गदर्शक सुचना महामंडळाच्या www.vjnt.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेl. योजनेच्या लाभासाठी
संकेतस्थळावरील पोर्टलव्दारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे.
तसेच बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत रु. ५ लाखापर्यंत (बँक सहभाग ७५ टक्के
व महामंडळ सहभाग २५ टक्के) महामंडळाच्या सहभाग २५ टक्के सहभागावर ४ टक्के व्याजदराने
कर्ज पुरवठा करण्यात येते. तसेच थेट कर्ज योजनेंतर्गत रु. १ लक्ष बिनव्याजी कर्ज पुरवठा
करण्यात येतो. सदर योजनेकरिता मार्गदर्शक सुचना महामंडळाच्या www.vjnt, org या संकेतस्थळावर
उपलब्ध आहे. अधिक माहिती करीता महामंडळाच्या कार्यालयात येडून संपर्क साधावा व जास्तीत
जास्त इच्छूक व्यक्ती व संस्थांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित), अकोला यांनी केले
आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा