‘गजर माऊलीचा ’ कार्यक्रमातून विठ्ठलभक्तीचा सुरेल जागर

 ‘गजर माऊलीचा ’ कार्यक्रमातून विठ्ठलभक्तीचा सुरेल जागर 


 सांस्कृतिक कार्य संचालनालया तर्फे २४ जुलै रोजी


अकोला येथे विशेष भक्तिसंगीत कार्यक्रम; आषाढी एकादशीनिमित्त अभंग, भक्तिगीते आणि वारकरी परंपरेचा भावस्पर्शी आविष्कार 


अकोला दि. 22 जुलै : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त ‘गजर माऊलीचा ’ या विशेष भक्तिसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता अकोला येथील प्रमिलाताई ओक हॉल येथे हा कार्यक्रम रंगणार आहे.

वारकरी संप्रदायाची अखंड भक्तिपरंपरा, संतांच्या अभंगांचे आध्यात्मिक चिंतन आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरातून भक्तिभाव जागविणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी एक आगळावेगळा सांस्कृतिक अनुभव ठरणार आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आदी संतांच्या विचारांचा आणि विठ्ठलभक्तीच्या समृद्ध वारशाचा सुरेल आविष्कार या कार्यक्रमातून सादर केला जाणार आहे.


कार्यक्रमात प्रसिद्ध श्री विठ्ठलाचे निशिंह भक्त अनेकांना व्यसनमुक्त करणारे कीर्तनकार प्रवचनकार संतोष महाराज पिसे यांच्या पावन वाणीतून 

गायनाचार्य हरिश्चंद्र पिसे, भानुदास धोटे, किशोर कावर गीता ताई पिसे, रश्मी पवार,विजय राऊत तबला,गावंडे महाराज शेगाव मृदंग,राजीव जोशी बासरी,लोकेश अवचार,कीबोर्ड,टाळ वादन,भक्तराज गावंडे,सुभाष बेले,राजेश वरुडकर,श्रीकृष्ण झटाले, संचलन डॉ.प्रदीप जी अवचार,गणेशजी बोरकर,धनंजय मिश्रा प्रस्तावना

 कल्याणी ताई पवित्रकार यांच्या सुमधुर आवाजातून भक्तिगीते, अभंग आणि विठ्ठलभक्तीपर रचनांचे सादरीकरण करण्यात येणार आह.

    यांच्या सुरेल स्वरांतून अभंग, भक्तिगीते आणि विठ्ठलनामाचा गजर अनुभवता येणार आहे.


आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक मानली जाते. वारकरी संप्रदायाने समता, भक्ती, मानवता आणि समाजप्रबोधनाचा संदेश शतकानुशतके जपला आहे. त्या परंपरेचे संगीतबद्ध आणि भावपूर्ण दर्शन या कार्यक्रमातून घडणार असून, सर्व वयोगटातील रसिकांना विठ्ठलभक्तीचा आनंद अनुभवण्याची संधी मिळणार आहे.


हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत अशा दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे.


या कार्यक्रमास अकोला व परिसरातील वारकरी, संगीतप्रेमी, कला रसिक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना