‘पॉश ॲक्ट’ तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षांचे प्रशिक्षण राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांची उपस्थिती नियोजनभवनात गुरूवारी कार्यशाळा

 

‘पॉश ॲक्ट’ तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षांचे प्रशिक्षण 

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांची उपस्थिती

नियोजनभवनात गुरूवारी कार्यशाळा

अकोला, दि. १ : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत ‘पॉश ॲक्ट’अन्वये गठित तक्रार निवारण समित्यांच्या अध्यक्षांचे प्रशिक्षण गुरुवार, दि. 2 जुलै रोजी दु. 1.30 वा. नियोजनभवनात होणार आहे.

 

राष्ट्रीय महिला आयोगातर्फे कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 (पॉश ॲक्ट) अन्वये विविध आस्थापनांमध्ये गठित तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तसे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

या कार्यशाळेमुळे पॉश कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह कार्यस्थळी महिलांसाठी सुरक्षित, सन्मानजनक व लैंगिक छळमुक्त वातावरण निर्माण करण्यास मदत होणार आहे.

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना