जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2024-25 व सन 2025-26 करीता अर्ज सादर करणेकरीता

 जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2024-25 व सन 2025-26 करीता अर्ज सादर करणेकरीता

अकोला, दि. १३ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, अकोला यांचे मार्फत सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षाकरीता शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि. 14 डिसेंबर 2022 नुसार जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला, दिव्यांग खेळाडू) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रत्येक वर्षाचे स्वतंत्र प्रस्ताव सादर करावे. सदर पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची दिनांक 10 जुलै 2026 पर्यंत होती. परंतु सदर अर्ज सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली असून वाढीव अंतिम तारीख दि.22 जुलै 2026 पर्यंत राहील. याची जिल्ह्यातील सर्व खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना