मतदान केंद्र सुसूत्रीकरणाबाबत राजकीय पक्षांची सभा जिल्ह्यात २० नवी मतदान केंद्रे प्रस्तावित; निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविणार

 


मतदान केंद्र सुसूत्रीकरणाबाबत

राजकीय पक्षांची सभा

जिल्ह्यात २० नवी मतदान केंद्रे प्रस्तावित; निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविणार   

      अकोला, दि. २८ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात मतदान केंद्रांतील प्रस्तावित बदलाची माहिती राजकीय पक्षांना करून देण्याच्या उद्देशाने राजकीय पक्ष प्रतिनिधींची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.

 

मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र राज्‍यासह १६ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशामध्ये राबविण्यात येत आहेत. त्यात मतदान केद्र सुसु्त्रीकरण व पुनर्रचना करण्यात येत आहे. अकोला जिल्‍ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामार्फत प्राप्‍त मतदान केंद्राचे प्रस्‍तावानुसार मतदान केंद्रामध्‍ये प्रस्‍तावित बदल हे मान्‍यता प्राप्‍त राजकीय पक्षांना अवगत होण्‍याचे द्दष्‍टीने ही बैठक झाली. जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी वर्षा मीना अध्यक्षस्थानी होत्या.  यावेळी उप

जिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, अतुल अमानकर, मनिष गावंडे, रमेश गायकवाड,पंकज साबळे, माधव मानकर, विनोद खडे, संजय सहदेव कोरडे आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, तसेच सर्व मतदार नोंदणी अधिकारी व्हिडीओ कॉन्‍फरन्‍सद्वारे उपस्थित होते.

जिल्ह्यात मूळ मतदान केंद्रांची संख्या १ हजार ७४१ आहे. त्यात २० नवीन मतदान केंद्रे प्रस्तावित आहेत. बाळापूर विधानसभा मतदारसंघात ३४७ मूळ मतदान केंद्रे असून, १० नव्याने प्रस्तावित आहेत. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात ३०७ मूळ मतदान केंद्रे असून, ३ केंद्रे नव्याने प्रस्तावित आहेत. अकोला पूर्व मतदारसंघात ३५१ मूळ मतदान केंद्रे असून, ५ नव्याने प्रस्तावित आहेत. मूर्तिजापूरमध्ये ३९० मूळ केंद्रे असून, २ केंद्रे नव्याने प्रस्तावित आहेत. अकोटमध्ये ३४६ मूळ मतदान केंद्रे असून, कोणताही बदल प्रस्तावित नाही.

        जिल्ह्यातील ज्या मतदान केंद्रांतील मतदार १ हजार २००हून अधिक झाले, तेथील मतदार शेजारच्या मतदान केंद्रात समाविष्ट केलेल्या मतदान केंद्राची संख्या एकूण ४४ आहे. त्याचप्रमाणे, ३ ठिकाणी मतदान केंद्राच्या जागेत बदल आहे. या सर्व प्रस्तावासंबंधी प्रतिनिधींना माहिती देण्यात आली.

                                त्‍याचप्रमाणे, अकोला जिल्ह्यातील कोणत्‍याही मतदान केंद्राच्‍या नावामध्‍ये बदल नसल्‍याचे उपस्थित राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांना अवगत करण्‍यात आले. हे प्रस्‍ताव मान्‍यतेसाठी मुख्‍य निवडणूक अधिकारी, महाराष्‍ट्र राज्‍य यांना सादर करण्‍यात येणार आहेत. प्रस्‍तावासभारत निवडणूक आयोगाकडून मान्‍यता मिळाल्‍यानंतर नविन मतदान केंद्र अस्तित्‍वात येतील याबाबत उपस्थित राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांना अवगत करण्‍यात आले.

        ०००  

               

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना