जिल्हास्तरीय लोकशाहीदिन ६ जुलै रोजी

 

जिल्हास्तरीय लोकशाहीदिन ६ जुलै रोजी

अकोला, दि. ३ : जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांग लोकशाही दिनाचे आयोजन दि. ६ जुलै  रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात तिस-या माळ्यावरील बैठक कक्षात करण्यात आले आहे.

 

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांग लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे, प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन तहसील स्तरावर होते. तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हास्तरीय लोकशाही दिन उपक्रमासाठी अर्ज करता येतो. लोकशाहीदिनाच्या १५ दिवस आधी अर्ज पाठविणे आवश्यक असते.

०००

टिप्पण्या