तेल्हारा व अकोट येथे जनगणना प्रशिक्षण

 तेल्हारा व अकोट येथे जनगणना प्रशिक्षण

अकोला : जनगणना २०२७ साठी गाव निर्देशिका(village Directory) आणि  शहर निर्देशिका (Town Directory) डेटा संकलनाचे काम दिनांक १६ ऑगस्ट २०२६ ते दिनांक १४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सुरु होणार आहे. त्यात १५ जुलै २०२६ रोजी तेल्हारा तालुक्याकरिता तहसिल कार्यालय तेल्हारा येथे तसेच दिनांक १६ जुलै २०२६ रोजीचे प्रशिक्षण अकोट तालुक्याकरिता घेण्यात आले असुन सदर प्रशिक्षण प्रशासकिय इमारत तहसिल कार्यालय अकोट येथे घेण्यात आले.
 तेल्हारा तालुक्यातील  प्रशिक्षणाकरिता तहसिलदार तेल्हारा, तहसिल कार्यालय तेल्‍हारा येथील ग्राम महसुल अधिकारी, ग्रामसेवक तसेच नगरपरिषद तेल्हारा तसेच नगरपरिषद हिवरखेड येथील क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. सदर प्रशिक्षणास जवळपास ५७ क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
अकोट तालुक्यातील प्रशिक्षणाकरिता तहसिलदार अकोट, तहसिल कार्यालय अकोट येथील ग्राम महसुल अधिकारी, ग्रामसेवक तसेच नगरपरिषद अकोट येथील क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. सदर प्रशिक्षणास जवळपास  ७० क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना प्रशिक्षण देण्याकरिता जनगणना संचालनालयाच्या सहाय्यक संचालक श्रीमती तेजल कटारे हया उपस्थित होत्या . प्रशिक्षणा दरम्यान सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना जिल्हा जनगणना पुस्तिकेकरिता आवश्यक बाबी जसे शैक्षणिक सुविधा, वैदयकिय सुविधा, पाणी आणि स्वच्छता सुविधा, दळणवळण, वाहतुक सुविधा आणि संपर्क माध्यम तसेच बॅंका, पत आणि इतर सुविधा, वीज आणि इतर वीज/इंधन सुविधा, मुख्य  कृषी उत्पादने वस्तु आणि हस्तकला तसेच शहर विभागाकरीता नागरी व अन्य पायाभुत सुविधा इत्यादीबाबतची माहिती संकलित करुन सदर माहिती DCHB  अँप व पोर्टलचे माध्य‍मातुन भरण्यात येईल. त्या नंतर जिल्हयाची परिपुर्ण माहिती संकलित करुन जनगणनेचे टप्पे पुर्ण झाल्यानंतर जिल्हयाचे पुस्तिकेमध्ये समाविष्ट करण्यात येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना