कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष यांचा दौरा; जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी योजनांचा आढावा कृषी योजनांचा लाभ सर्वदूर पोहोचावा ॲड.निलेश हेलोंडे पाटील







 

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष यांचा दौरा; जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी योजनांचा आढावा


कृषी योजनांचा लाभ सर्वदूर पोहोचावा
 
  ॲड.निलेश हेलोंडे पाटील


अकोला, दि. १८ : शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा. आपत्ती मदतविषयक प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत. ती खोळंबून राहता कामा नये, असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी दिले.

मिशनचे अध्यक्ष श्री. हेलोंडे यांनी कृषी योजनांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजय पाटील, कृषी अधीक्षक मुरलीधर इंगळे,महाबीजचे महाव्यवस्थापक संजय गरकल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिगंबर लोखंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना वेळेवर मदत मिळणे ही प्रशासनाची सामूहिक जबाबदारी असून अशा कुटुंबांची मदत प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. तसेच तणाव, नैराश्य व आत्महत्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाच्या प्रेरणा' प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या टोल-फ्री आरोग्य हेल्पलाइन १४४१६ ची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी. आत्महत्याग्रस्त गावांमध्ये आरोग्य विभागाने गृहभेटींचे प्रमाण वाढवून समुपदेशनाला प्राधान्य द्यावे,अशी सूचना श्री हेलोंडे यांनी दिली.



श्री.हेलोंडे म्हणाले की,खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण करावे.दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धनाला चालना देण्यासाठी व जनावरांना वर्षभर हिरवा व पोषक चारा उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक चारा लागवड नियोजन करावे.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमान योजनांसह शेतकरी हितावह विविध योजनांची माहिती, महाडीबीटी अर्ज प्रक्रिया, वन्यप्राण्यापासून शेती नुकसान भरपाई यासह विविध योजनांची माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी.
वन्यप्राण्यापासून शेती नुकसान भरपाई प्रकरणे निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे.


जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी सुरू केलेल्या संवाद, समुपदेशन व मार्गदर्शन उपक्रमाची माहिती दिली. या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात दर तीन महिन्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसोबत संवाद व समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. हा उपक्रम शेतकरी कुटुंबांना मानसिक आधार देण्यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास श्री.हेलोंडे यांनी व्यक्त केला

--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना