पॉश कायदा अंमलबजावणीचा आढावा; वन स्टॉप सेंटरची पाहणी जिल्ह्यातील सर्व आस्थापनांत एका महिन्यात समित्या स्थापन करा - राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर
पॉश कायदा अंमलबजावणीचा आढावा; वन स्टॉप सेंटरची पाहणी
जिल्ह्यातील सर्व आस्थापनांत
एका महिन्यात समित्या स्थापन करा
-
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर
अकोला, दि. २ : जिल्ह्यातील सर्व आस्थापनांमध्ये पॉश कायद्यांतर्गत
तक्रार निवारण समित्या स्थापण्याची कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करावी, असे स्पष्ट
निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या विजया रहाटकर यांनी आज येथे दिले.
पॉशअंतर्गत समिती, महिला व बालविकास यंत्रणा व संबंधित यंत्रणांच्या
कामकाजाचा आढावा श्रीमती रहाटकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयात झाला,
त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी अनय नावंदर, जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव दीनानाथ दाभाडे, पोलिस अधीक्षक
अर्चित चांडक, आयोगाचे उपसंचालक रामावतार सिंह, महापालिकेचे आयुक्त सुनील लहाने, जिल्हा
महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे, पर्यवेक्षकीय अधिकारी गिरीश पुसदकर आदी उपस्थित
होते.
श्रीमती रहाटकर म्हणाल्या की, जिल्ह्यात ६१२ तक्रार निवारण समित्यांची
स्थापना झाली आहे. तथापि, शाळा-महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय संस्था, खासगी आस्थापनांची
आकडेवारी पाहता या सर्वच ठिकाणी समित्या स्थापणे आवश्यक आहे. ते सर्व तपासून एका महिन्यात
कार्यवाही पूर्ण करावी. त्यानंतर समिती सदस्यांना प्रशिक्षण देण्याची कार्यवाही ३ महिन्यांत
पूर्ण करावी. समित्यांच्या कार्यवाहीचा वार्षिक अहवाल नियमितपणे जिल्हाधिका-यांना सादर
करावा. पॉश कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी पंतप्रधान वंदना योजना, बेटी बचाओ, बेटी पढाओ, लखपती दीदी, सुकन्या
समृद्धी आदी महिला सक्षमीकरण योजना, तसेच मनरेगा, प्रधानमंत्री आवास योजना, विश्वकर्मा
आदी योजनांतील महिला लाभार्थ्यांचा सहभाग व अनुषंगिक तरतुदींचा आढावा श्रीमती रहाटकर
यांनी यावेळी घेतला.
वन स्टॉप सेंटरची पाहणी
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी जिल्हा स्त्री
रूग्णालयातील वन स्टॉप सेंटरची पाहणी करून तेथील कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी
वर्षा मीना यावेळी उपस्थित होत्या.
वन स्टॉप सेंटरचे कार्यालय, बालस्नेही कक्ष, व्यवस्था व सुविधांची पाहणी
त्यांनी केली. रजिस्टरची पाहणी करून तेथील कर्मचा-यांशी संवादही त्यांनी साधला.
०००


.jpeg)

.jpeg)


.jpeg)

.jpeg)

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा