राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांसाठी प्रस्ताव मागविले

 राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांसाठी प्रस्ताव मागविले

अकोला, दि. 21 : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी या योजना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत.
इच्छुक ग्रंथालयांनी प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले नियम, अटी व अर्जाचा नमुना डाउनलोड करून विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करावेत.
समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना कमाल २५ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार आहे. याशिवाय इतर समान निधी योजनांचा लाभ केंद्रीय पध्दतीने दिला जाणार असल्याने त्या योजनांसाठी प्रस्ताव सादर करू नयेत.
असमान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तारासाठी अर्थसहाय्य, ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य, ग्रंथालयांचे आधुनिकीकरण, महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी विशेष अनुदान, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन तसेच बालकोपरा स्थापन करण्यासाठीही आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वरीलपैकी कोणत्याही एका योजनेसाठी इच्छुक ग्रंथालयांनी आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी किंवा हिंदी भाषेत चार प्रतींमध्ये प्रस्ताव संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे दि. २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत सादर करावेत. तसेच राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या ऑनलाइन प्रणालीद्वारेही प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना