लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी २४ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी २४ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अकोला, दि. : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), जिल्हा कार्यालय अकोला यांच्या वतीने मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी २४ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत.
या योजनेअंतर्गत सन २०२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच इतर अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यास त्यांना गुणक्रमानुसार व उपलब्ध निधीच्या अधीन राहून शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.
अर्जासोबत विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, गुणपत्रिका तसेच पुढील वर्गात प्रवेश घेतल्याबाबतचे बोनाफाईड प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), जिल्हा कार्यालय, अकोला येथे २४ जुलै २०२६ पर्यंत सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा कोणताही विचार केला जाणार नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना