गोशाळांना नोंदणी प्रमाणपत्र वितरित


 गोशाळांना नोंदणी प्रमाणपत्र वितरित


अकोला, दि. १८ : गोशाळांना नोंदणी प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते मंगळवारी झाला.


देशी गोवंश संवर्धन, संरक्षण व कल्याण करण्यासाठी व त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी गोसेवा आयोग गठित करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात 29 गोशाळा आयोगाकडे नोंदणीकृत आहेत. त्यात प्रतिनिधी स्वरूपात आज पाच वर्षांच्या संचालकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नोंदणी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

आयोगाचे सदस्य उद्धव नेरकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अभिजित परांडेकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दीपक उफाळे, पशुधन विकास अधिकारी डॉ. कोमल काळे आदी उपस्थित होते.

सर्व गोवंशाला टॅगिंग करावे. अभिलेख सुयोग्यरित्या जतन करावा. आत्मनिर्भर गोशाळेसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन श्री. नेरकर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा