नोंदणी विभागातील शिपाई भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा
नोंदणी विभागातील शिपाई भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा
अकोला, दि. २६ : नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट ड संवर्गातील २८४
पदे भरण्यात येत आहेत. ही प्रक्रिया इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेलमार्फत होत असून,
प्राप्त अर्जांनुसार पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दि. १ ते ८ जुलैदरम्यान होणार
आहे, अशी माहिती सह जिल्हा निबंधक आर. पी. भालेराव यांनी दिली.
उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेल
पत्त्यावर प्रवेशपत्रे पाठविण्यात येत आहेत. परीक्षेसाठी विभागाकडून कोणताही मध्यस्थ
नेमलेला नाही. तशी बतावणी कुणी करत असेल तर सावध राहावे व फसवणुकीला बळी पडू नये, असे
आवाहन करण्यात आले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा