राज्य अजिंक्य मुष्टियुद्ध स्पर्धेत अकोल्याला ९ पदके साक्षी गायधनी व कांचन सुरांसेला सुवर्णपदक ४ सुवर्ण, १ रौप्य व ४ कांस्यपदकांचा समावेश
राज्य अजिंक्य मुष्टियुद्ध स्पर्धेत अकोल्याला
९ पदके
साक्षी गायधनी व कांचन सुरांसेला सुवर्णपदक
४ सुवर्ण, १ रौप्य व ४ कांस्यपदकांचा
समावेश
अकोला, दि.२६ : वरिष्ठ राज्यस्तरीय महिला मुष्टियुद्ध स्पर्धेत अकोला
क्रीडा प्रबोधिनी व अकोला शहर संघाच्या खेळाडूंनी तब्बल ९ पदके पटकावत राज्यात पहिला
क्रमांक मिळवला. साक्षी गायधनी, कांचन सुरांसे यांनी सुवर्णपदक मिळवले असून, अकोल्याच्या
मुष्टियोद्ध्यांचा राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश निश्चित झाला आहे.
वरोरा येथे नुकतीच राज्यस्तरीय महिला मुष्टियुद्ध स्पर्धा झाली. त्यात
क्रीडापीठ संघातून ८० कि. वजनगटात साक्षी गायधनी व ८० किलोवरील गटात कु. कांचन सुरांसे
यांनी, ७५ कि. वजनगटात विधी रावळ व ५७ कि. वजनगटात कु. सपना चव्हाण यांनी सुवर्णपदक
मिळवले.
रूणाली डोंगरे यांनी ४८ कि. वजनगटात रौप्यपदक मिळवले. पूनम कैथवास यांनी
६० कि. वजनगटात व गौरी मुरूमकार यांनी ७० कि. गटात कांस्यपदक प्राप्त केले. अकोला शहर
संघामधुन ६५ कि. गटात सिमरन गवई व ८०+ गटात
प्रियंका खंडारे यांनी कांस्यपदक प्राप्त केले.
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी गुणवंतांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस
शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षक सतीशचंद्र भट यांच्या मार्गदर्शनानुसार खेळाडू प्रशिक्षण
घेत आहेत. क्रीडा प्रशिक्षक म्हणून योगेश निषाद व स्नेहा वणवे यांचे मार्गदर्शन लाभले.
क्रीडा विभाग सहायक संचालक सुधीर मोरे, क्रीडापीठ प्रमुख सुहास पाटील, उपसंचालक संजय
सबनीस, शेखर पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा