गळितधान्य खाद्य तेल अभियानात गोदाम सुविधा अर्ज करण्याचे ‘एसएओं’चे आवाहन
गळितधान्य
खाद्य तेल अभियानात गोदाम सुविधा
अर्ज करण्याचे ‘एसएओं’चे आवाहन
अकोला, दि. 18 : गळितधान्य खाद्य तेल अभियानात गोदाम सुविधा, तेल
काढणी युनिट आदी लाभांसाठी शेतकरी उत्पादक कंपनी किंवा कंपनी यांनी जुलैअखेरपूर्वी
तालुका कृषी कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
शंकर किरवे यांनी केले आहे.
गोदाम सुविधा
अन्नधान्य उत्पादनाच्या
सुधारित साठवणुकीसाठी व मूल्य वृध्दीसाठी गोदाम सुविधा आवश्यक आहे. या योजनेत 250 मे. टन क्षमतेचे गोदाम
बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12
लक्ष 50 हजार यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय आहे.
इच्छुक अर्जदार शेतकरी
उत्पादक संघ किंवा कंपनी (FPC/FPO) यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना
किंवा नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने
कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित अर्जदार कंपनी संघ या बाबीच्या लाभास पात्र राहील.
वरील दोन्ही घटकांसाठी इच्छुक शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनी यांनी माहे जुलै २०२५
अखेर अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे
सादर करावा.
जिल्ह्यासाठी प्राप्त लक्षांकापेक्षा अधिक शेतकरी उत्पादक संघ
किंवा कंपनीचे (FPC/FPO) अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या
मान्यतेने सोडत पध्दतीने लाभार्थी शेतकरी संघ किंवा कंपनीचे निवड करण्यात येईल.
तेल
काढणी युनिट (१० टन क्षमता )
राष्ट्रीय खाद्य तेल अभियान (गळीतधान्य) सन
२०२५-२६ योजनेत शासकीय/खाजगी उद्योग, शेतकरी
उत्पादक संघ, कंपनी (FOP/FPC)आणि सहकारी संस्था यांना तेल
काढणी युनिट (१० टन क्षमता ) आणि
तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्र सामग्री आणि उपकरणे आणि तेलबिया प्रकिया
युनिट करिता लाभ घेता येईल. तरी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी व उद्योजक या योजनेचा
लाभ घ्यावा, असे आवाहन
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.
तेलबिया संकलन, तेल काढणे आणि तेल उत्पादन
कार्यक्षमता वाढविण्यासाठी, सध्या कार्यरत पायाभूत सुविधांची क्षमता किंवा
कार्यक्षमता सुधारणा करता येईल. त्याचप्रमाणे, कापणीनंतरच्या पायाभूत सुविधांच्या
उभारणीसाठी शासकीय/खासगी उद्योग, शेतकरी उत्पादक संघ, कंपनी(FPC/FPO) यांना तेल
काढणी युनिट (१० टन क्षमता ) उभारणी आणि
तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्र सामग्री आणि उपकरणे आणि तेलबिया प्रकिया
युनिट करिता प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के कमाल रु.९,९०,००० यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील.
ही बाब बँक कर्जाशी
निगडीत असून शासकीय /खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संघ व कंपनीने बँकेकडे यासाठी
प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित शेतकरी उत्पादक संघ
किंवा कंपनी या बाबीच्या लाभास पात्र राहील. जुलैअखेरपर्यंत अर्ज तालुका कृषी
अधिकारी यांच्याकडे सादर करावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा