आणीबाणीत लढा देणा-या व्यक्तींचा जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव प्रदर्शनाचाही शुभारंभ
आणीबाणीत लढा देणा-या
व्यक्तींचा जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव
प्रदर्शनाचाही शुभारंभ
अकोला, दि. 25 : आणीबाणीच्या कालावधीत लढा देणा-या,
कारावास भोगलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींचा जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या
स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचाही
शुभारंभही यावेळी करण्यात आला.
नियोजनभवनात गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले. अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना सन्मानपत्र व
गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, अधिक्षक
श्याम धनमने, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित
होते.
देशात सन 1975 ते 1977 मध्ये आणीबाणी कालावधीत
लढा देताना जिल्ह्यातील ज्या व्यक्तींनी मिसा व आयआरअंतर्गत सामाजिक व राजनैतिक कारणासाठी
कारावास भोगलेला आहे, अशा व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे
सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. लोकतंत्र सेनानी संघटनेचे सिद्धेश्वर
देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आणीबाणीत कारावास भोगलेले ज्येष्ठ मान्यवर,
त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानिमित्त या काळाची माहिती
देणारे प्रदर्शनही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीत पहिल्या मजल्यावर भरविण्यात
आले आहे. ते सकाळी १० ते ६ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा