हत्तीरोग टाळण्यासाठी वेळीच उपचार आवश्यक हत्तीरोग सर्वेक्षण पथकाची माहिती

 

हत्तीरोग टाळण्यासाठी वेळीच उपचार आवश्यक

हत्तीरोग सर्वेक्षण पथकाची माहिती

अकोला, दि. 3: हत्तीरोग हा गंभीर आजार असून, वेळीच लक्षणे ओळखल्यास नियंत्रण ठेवणे शक्य आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा हत्तीरोग सर्वेक्षण पथकाचे वैज्ञानिक अधिकारी कुंदन इंगळे यांनी दिली.

जागतिक हत्तीरोग दिन ५ जूनला साजरा होतो. त्यानिमित्त नागरिकांना दक्षतेबाबत आवाहन करण्यात आले आहे.

हत्तीरोगात मायक्रोफायलेरियाची कृमी क्युलेक्स डासापासून माणसाच्या शरीरात प्रवेश करते. क्युलेक्स डासांची उत्पत्ती अस्वच्छ परिसर व थांबलेल्या घाण पाण्यात होते. साचलेल्या घाण पाण्यास हा डास अंडी देतो व पुढे त्याचे प्रौढ डासात रूपांतर होते. त्यामुळे परिसरातील साचलेले पाणी, डबकी वाहती करावी. सेप्टिक टँकला घट्ट झाकण लावावे. झोपताना मच्छरदाणी वापरावी. ऑईल बॉलचा वापर करावा.

 

हत्तीरोगात पायावर सूज येते. पाय हत्तीच्या पायासारखे दिसतात. अंडवृद्धी होते. त्यामुळे व्यक्तीच्या हालचालीवर मर्यादा येतात व ती हतबल होते. सुरूवातीला पायावर सूज येते, दोन पायात असमानता दिसते. अशी लक्षणे आढळताच वेळीच रक्ताची तपासणी करावी. त्याचवेळी उपचार केले तर आजाराची पुढील वाढ थांबवणे शक्य आहे. डीईसी ही गोळीही प्रतिबंधक म्हणून घेतल्यास आजार टाळता येतो.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा