लहान वयात काम केल्याने खुंटतो बालकांचा विकासबालमजुरीविरोधात कामगार विभागाची मोहिम
लहान वयात काम केल्याने खुंटतो बालकांचा विकास
बालमजुरीविरोधात कामगार विभागाची मोहिम
अकोला, दि.१७: लहान वयात कामे केल्यामुळे बालकांच्या त्वचा, श्वसनमार्ग
संस्था, मेंदू, जठर संस्था यावर विपरित परिणाम होऊन त्यांची मानसिक, बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटते. जागतिक कामगार दिनाचे औचित्य
साधून सहायक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे बालमजुरीविरोधात मोहिम राबविण्यात येत आहे.
विभागातर्फे बालकामगारविरोधी सप्ताहाचे आयोजन करून जिल्ह्यातील विविध
व्यापारी संघटनांच्या पदाधिका-यांच्या बैठकांचे आयोजन करून बालमजुरी निर्मूलनासाठी
आवाहन करण्यात येत आहे. आमच्याकडे बालकामगार काम करीत नाहीत व यापुढेही बालकामगार ठेवणार
नाही, असे हमीपत्र व्यापारी वर्गाकडून भरून घेण्यात येत आहे.
प्रत्येक बालकाला चांगले जीवन जगण्याचा अधिकार आहे. सर्वांनी मिळून
बालमजुरीमुक्त महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प करावा. सर्व नागरिकांनी या मोहिमेत योगदान
द्यावे, असे आवाहन सहायक आयुक्त रा. रा. काळे व म. तु. जाधव यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा