पुनर्रचित हवामानाधारित फळपीक विमा योजना दि. ३० जूनपर्यंत मुदत वाढवली सहभागासाठी शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य

 

पुनर्रचित हवामानाधारित फळपीक विमा योजना

दि. ३० जूनपर्यंत मुदत वाढवली

सहभागासाठी शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य

अकोला, दि. १९ : पुनर्रचित हवामानाधारित फळपीक विमा योजनेत लिंबू, संत्रा, पेरू पिकांसाठीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. सहभागासाठी शेतकरी ओळख क्रमांक व ई पीक पाहणी बंधनकारक आहे.  

चालू मृग बहारातील लिंबू, संत्रा, पेरू या पिकांच्या  शेतकरी सहभागासाठी १४ जूनपर्यंत मुदत होती. ती आता 30 जूनपर्यंत मुदत वाढविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

     अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे शेतकरी व कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. अकोला जिल्ह्यात योजनेच्या अंमलबजावणीसाठी युनिवर्सल सोम्पो जनरल इन्सुरन्स कंपनी नेमण्यात आली आहे. कंपनीचा पत्ता १०३, पहिला मजला MAIDC,आकृती स्टार, सेंट्रल रोड, अंधेरी (पूर्व) – मुंबई ४०००९३, दूरध्वनी क्रमांक १८०० २२४०३०/१८०० २००४०३०, ई-मेल:-  contactus@universalsompo.com असा आहे.  

विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता

संत्रा व मोसंबी (हप्ता ५ हजार, संरक्षित रक्कम १ लाख प्रति हे.), लिंबू (हप्ता ४ हजार, संरक्षित रक्कम ८० हजार प्रति हे.,), डाळिंब (हप्ता ८ हजार रू., संरक्षित रक्कम १ लाख ६० हजार रू. प्रति हे.), पेरू (हप्ता ३५०० रू. संरक्षित रक्कम ७० हजार प्रति हे.

जिल्ह्यातील अधिसूचित मंडळे

डाळिंबासाठी अकोला तालुक्यातील शिवणी हे महसूल मंडळ अधिसूचित आहे. पेरू व मोसंबीसाठी पातूर तालुक्यातील पातूर मंडळ अधिसूचित आहे. लिंबू पीकासाठी जिल्ह्यातील बोरगाव मंजू, शिवणी, सांगळूद, कापशी – रोड, कौलखेड, राजंदा, धाबा, महान, खर्डा बु , बार्शीटाकळी, पिंजर, निंभा, जामठी बु, कुरूम, मूर्तीजापुर, हातगाव, अकोलखेड, आसेगाव बा, उमरा, पणज, मुंडगाव, अकोट, अडगाव बु, हिवरखेड, माळेगाव बा, पातूर, बाभूळगाव, आलेगाव, सस्ती, चान्नी, वाडेगाव, बाळापुर, व्याळा ही महसूल मंडळे अधिसूचित आहेत.

 

संत्रा पीकासाठी अकोलखेड, उमरा, पणज, अकोट, अडगाव बु, हिवरखेड, माळेगाव बा, तेल्हारा, पातूर, आलेगाव, राजंदा, धाबा, महान, खर्डा बु , बार्शीटाकळी, पिंजर, कुरूम, हातगाव, निंभा ही मंडळे अधिसूचित आहेत.

 

योजनेत भाग घेण्यासाठी ॲग्रीस्टेक नोंदणी क्रमांक, आधार कार्ड, बँक पासबुक, जमीन धारणा उतारा, जिओ टॅग फोटो, ई - पीक पाहणी बंधनकारक आहे. ई पीक पाहणी नोंद नसल्यास पिक विमा अर्ज रद्द होऊ शकतो.ई पीक नोंदणी योजनेत भाग घेतल्यानंतर जुलै - ऑगस्ट महिन्यात करू शकतात.

संत्रा, लिंबू,पेरू, मोसंबी या फळपीकांसाठी ३० जूनपूर्वी व डाळिंबासाठी १४ जुलैपूर्वी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा