करचुकवेगिरीविरोधात वस्तू व सेवा कर विभागाची मोहिम कर बुडविणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल
करचुकवेगिरीविरोधात
वस्तू व सेवा कर विभागाची मोहिम
कर बुडविणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल
अकोला, दि. २६ : येथील ३४ कोटींपेक्षा अधिक वस्तू व सेवा कर (जीएसटी)
बुडविणाऱ्या खासगी कंपनीविरोधात राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्या तक्रारीवरून अकोला
पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बेग कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी ३४ कोटी ३५ लाख ७२ हजार ८२७ रू. रकमेची
करचुकवेगिरी केल्याचे निदर्शनास आल्यावरून राज्यकर निरीक्षक प्रदीप आरव यांनी अकोला
शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही कंपनी व संचालक इम्रान बेग, रशीद बेग यांच्याविरोधात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कार्यवाहीसाठी अमरावती विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय पोखरकर व अकोला
कार्यालयाच्या उपायुक्त अर्चना चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. कर बुडवणाऱ्यांविरोधात
कठोर पावले उचलली जातील. सर्व थकबाकीदार व्यापाऱ्यांनी त्वरित कर भरणा करावा, अन्यथा
कारवाईला सामोरे जावे लागेल, राज्यकर विभागाचे सहआयुक्त संजय पोखरकर यांनी दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा