विनामूल्य धान्य अवैधरीत्या विकल्यास शिधापत्रिका रद्द करणार जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार
विनामूल्य धान्य अवैधरीत्या विकल्यास शिधापत्रिका रद्द
करणार
जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार
अकोला, दि. २६ : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत विनामूल्य मिळणारे गहू,
तांदूळ आदी धान्य अवैधरीत्या विकल्याचे आढळल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल, असा
इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार यांनी दिला आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे रास्त भाव दुकानांतून पात्र शिधापत्रिकाधारकांना
विनामूल्य धान्य दिले जाते. पावसाळ्यात निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन जून,
जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांचे धान्यवाटप एकाचवेळी होत आहे. तथापि, शिधापत्रिकाधारकांकडून
मिळालेले धान्य अवैधरीत्या खरेदी करून त्याचा साठा व वाहतूक होत असल्याबाबत तक्रारी
होत आहेत. शासकीय धान्याची अवैध खरेदीविक्री
नियमबाह्य आहे.
त्यामुळे कुणीही शिधापत्रिकाधारक व्यावसायिकांकडे विक्री करताना आढळून
आल्यास त्यांचे लाभार्थी यादीतून नाव वगळण्यात येईल, तसेच शिधापत्रिका रद्द करण्यात
येईल. त्याचप्रमाणे, शासकीय धान्याची अवैध साठवणूक करणा-या व्यावसायिकांवर फौजदारी
गुन्हा दाखल करण्यात येईल, असाही इशारा श्री. यन्नावार यांनी दिला आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा