गरजूंना उपचार, मदतीसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी

 

 

गरजूंना उपचार, मदतीसाठी

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी

अकोला, दि. २७ : मुख्यमंत्री सहायता निधीतून गरजूंना वैद्यकीय मदतीसाठी ३० लक्ष ३० हजार रू. रकमेचे ३७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीत पहिल्या मजल्यावर हे कार्यालय सुरू आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते या कार्यालयाचा शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी अजित कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनात कक्षातर्फे गुणवत्तापूर्ण कार्यवाही होत आहे.  

 

धर्मादाय आयुक्त कार्यालयाअंतर्गत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्तपेढीसह प्रमाणित रूग्णालये १२ आहेत. इतर प्रमाणित रूग्णालयांची संख्या ४४ आहे. जिल्ह्यात वैद्यकीय मदतीचे ३७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, ६७ प्रस्तावांवर कार्यवाही होत आहे.

कक्षातर्फे रक्तदान शिबिरांद्वारे रक्तपिशव्यांचे संकलन, आपत्ती व्यवस्थापनासाठी मॉक ड्रिल, लाभार्थ्यांमध्ये वृक्षारोपणाबाबत प्रबोधन असे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती डॉ. विशाल येदवर यांनी दिली.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा