महिला व बालविकास कार्यालय नव्या जागेत

 

महिला व बालविकास कार्यालय नव्या जागेत

अकोला, दि. ३० : जिल्हा महिला व बालविकास कार्यालय आता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून महिला व बालविकास भवन या नव्या जागेत स्थलांतरित झाले आहे.  

या कार्यालयाबरोबरच जिल्हा बाल संरक्षण कक्षही महिला व बालविकास भवनात स्थलांतरित झाला आहे. या दोन्ही कार्यालयांचे नव्या जागेत कामकाज दि. १ जुलैपासून सुरू होईल. महिला व बालविकास भवन ही वास्तू माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयानजिक श्री संतोषी मातेच्या देवळालगत आहे. संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन