जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

 

 

जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

अकोला, दि. ३० : अकोला जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १३६.९ मिमी आहे. यंदा जून महिन्यात १५५.८ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या ११३.८ टक्के आहे. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १३९ मिमी (सरासरीच्या १०१.५ टक्के) होते. जिल्ह्यातील पाच तालुक्यांत १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे.

 

आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे दि. ३० जून रोजी सकाळी १० वा. प्राप्त माहितीनुसार, जून महिन्याचे तालुकानिहाय पर्जन्यमान खालीलप्रमाणे  :

अकोट तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १२४.५ मिमी आहे. अकोट तालुक्यात यंदा जून महिन्यात १५३.६ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या १२३.३ टक्के आहे. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १८०.८ मिमी (सरासरीच्या १४५.१ टक्के) होते.

तेल्हारा तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १२० मिमी आहे. तेल्हारा तालुक्यात यंदा जून महिन्यात १६३.२ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या १३६.१ टक्के आहे. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १३४.२ मिमी (सरासरीच्या १११.९ टक्के) होते.

बाळापूर तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १३०.१ मिमी व तालुक्यात यंदा जून महिन्यात १७१.८ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या १३२ टक्के आहे. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १२४.६ मिमी (सरासरीच्या ९५.८ टक्के) होते.

पातूर तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १५५.६ मिमी व तालुक्यात यंदा जून महिन्यात २१८.२ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या १४०.३ टक्के आहे. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १७१.४ मिमी (सरासरीच्या ११०.२ टक्के) होते.

अकोला तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १३४ मिमी व तालुक्यात यंदा जून महिन्यात १३१.८ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या ९८.४ टक्के आहे. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १११.९ मिमी (सरासरीच्या ८३.५ टक्के) होते.

बार्शिटाकळी तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १४८.१ मिमी आहे. तालुक्यात यंदा जून महिन्यात १८०.८ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या १२२.१ टक्के आहे. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १३३.६ मिमी (सरासरीच्या ९०.२ टक्के) होते.

मूर्तिजापूर तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान १४५.८ मिमी व तालुक्यात यंदा जून महिन्यात ११८.२ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या ८१.१ टक्के आहे. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १३८.५ मिमी (सरासरीच्या ९५ टक्के) होते.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा