मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

 मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

अकोला, दि.२० : सामाजिक न्याय विभागाच्या अकोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या वसतिगृहात ११ वी, पॉलिटेक्निक व आयटीआय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी जागा उपलब्ध आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://hmas.mahait.org  या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. अकोल्याचा रहिवाशी नसलेल्या मात्र, अकोला महापालिकेच्या सीमेआत असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. जास्तीत जास्त इच्छूकांनी अर्ज करावे असे आवाहन गृहपाल के. एम. तिडके यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, संतोषी मातेच्या देवळाजवळ, हनुमान वसाहत येथे संपर्क साधावा. वसतिगृहाचा संपर्क क्र. ९९२१६९७०५३ असा आहे.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा