पंढरीच्या वारक-यांना पथकरातून सवलत
पंढरीच्या वारक-यांना पथकरातून सवलत
अकोला, दि. २७ :श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी जाणा-या पालख्या,
वारकरी यांना पथकरातून सवलत देण्यात आली आहे.
ही सवलत दि. १० जुलैपर्यंत पालखी, वारक-यांच्या हलक्या व जड वाहनांसाठी
असेल. त्यासाठी पास देण्यात येत आहेत. ते परतीच्या प्रवासातही ग्राह्य असतील. असा पास
मिळवू इच्छिणा-या व्यक्तींनी प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज करावा. वाहन क्रमांक,
मालकाचे नाव, भ्रमणध्वनी, प्रवासाच्या तारखा आदी माहिती, तसेच आधारपत्राची स्वसाक्षांकित
प्रत जोडावी.
अकोला जिल्ह्यातून आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणा-या भाविक, पालख्या
व वारकरी यांनी पथकर सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी
केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा