राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान पीक प्रात्यक्षिक व बियाणे वितरणासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

 

राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान

पीक प्रात्यक्षिक व बियाणे वितरणासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

अकोला, दि. 18 : शेतकऱ्यांना दर्जेदार प्रमाणित बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध व्हावे, तसेच कडधान्य व गळितधान्य पिकांच्या नवीन वाणाचा प्रचार, प्रसार व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय अन्न व पोषण  सुरक्षा अभियान कडधान्य व कापूस या पीकांसाठी राबविण्यात येत आहे.

 

त्यात पीक प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येणार आहे.  पीक प्रात्यक्षिकात तूर ,मूग ,उडीद व कापूस (१०० टक्के अनुदावर ०.४० हे. / शेतकरी मर्यादेत) फक्त शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी /कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इ.करिता (शेतकरी गट हा ३१ मार्च २०२४ पूर्वी नोंदणी केलेला असावा.), त्याचप्रमाणे प्रमाणित बियाणे वितरण तूर, मूग, उडीद (१० वर्षांआतील बियाणे रु.५००० प्रति क्विं. क्षेत्र २.०० हे. / शेतकरी मर्यादेत व १० वर्षा वरील बियाणे रु.२५०० प्रति क्विं. क्षेत्र २.०० हे. / शेतकरी मर्यादेत) अशी तरतूद आहे.

खाद्य तेल व तेलताड अभियान (गळितधान्य) अंतर्गत पीक प्रात्यक्षिक सोयाबीन  (१०० टक्के अनुदावर ०.४० हे. / शेतकरी मर्यादेत) फक्त शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी /कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इ.करिता (शेतकरी गट हा ३१ मार्च २०२४ पूर्वी नोंदणी केलेला असावा ), तसेच प्रमाणित बियाणे वितरण सोयाबीन  (५ वर्षा आतील बियाणे १००% अनुदावर १.०० हे. /शेतकरी मर्यादेत) अशी तरतूद आहे.

सोयाबीन, तुर, मूग व उडीद या पिकाच्या अनुदान तत्वावर बियाणे लाभ मिळणे करिता  महाडीबीटी पोर्टलवर जाऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  अर्ज करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कृषि विभागाच्या कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.  

                                                                                             ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा