कृषीदिनानिमित्त प्रगतीशील शेतक-यांचा गौरव होणार
कृषीदिनानिमित्त प्रगतीशील शेतक-यांचा गौरव होणार
अकोला, दि. २६ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या
जयंतीनिमित्त दि. १ जुलै कृषीदिन साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी सकाळी ११ वा. जि.
प. कर्मचारीभवन परिसरातील संविधानभवनात प्रगतीशील शेतक-यांचा गौरव कार्यक्रम आयोजित
करण्यात आला आहे.
प्रत्येक तालुक्यातून दोन याप्रमाणे प्रगतीशील शेतकरी व जिल्हास्तरीय
पीक स्पर्धेतील विजेते यांचा सत्कार करण्यात येईल. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या
तज्ज्ञांचे मार्गदर्शनही यावेळी होईल. अधिकाधिक शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी उपस्थित
राहण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा