विविध कंपन्यांच्या भरतीसाठी १८ जूनला प्लेसमेंट ड्राइव्ह

 

 

 

 विविध कंपन्यांच्या भरतीसाठी १८ जूनला प्लेसमेंट ड्राइव्ह

अकोला दि. 13 : नोकरी इच्छूक उमेदवारांना खाजगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला व मॉडेल करिअर सेंटर यांचे संयुक्त विद्यमाने दि. १८ जून २०२५ रोजी "प्लेसमेंट ड्राईव्हचे" आयोजन करण्यात आले आहे.

 

मेळाव्यात उपस्थित असणाऱ्या कंपनी, उद्योजक, आस्थापनाकडील रिक्तपदांकरिता पात्रता : ट्रेड कार्ट डिजीटल, अकोला (एकुण रिक्त पदे- १२ ) शैक्षणीक पात्रता किमान १० वी, १२ वी किंवा पदवीधर, शोपन्झा सर्व्हिसेस अकोला (एकुण रिक्तपदे - ४९) शैक्षणिक पात्रता किमान १० वी, १२ वी किंवा पदवीधर, भारतीय जीवन विमा निगम अकोला (एकुण रिक्तपदे - २०) केवळ महिला करिता शैक्षणीक पात्रता किमान १२ वी पास, दयाल इंण्डस्ट्रिज बाभुळगांव, अकोला (एकुण रिक्तपदे - २०) शैक्षणीक पात्रता किमान १२ वी, आयटीआय वाईडिंग ट्रेड किंवा केमिकल अभियांत्रीकी पदवीधर ऑनलाईन अर्जाकरिता https://forms.gle/5v5rTuqwN6XF8cvN7 या लिंकवर करावे.

सदर " प्लेसमेंट ड्राईव्हला" (रोजगार मेळाव्यात) ऑनलाईन सहभाग नोंदविण्यासाठी पुढील प्रक्रीया करावी. 1. www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळा भेट द्या. २. Employment या टॅबवर क्लिक करा. ३. Job Seeker हा पर्याय निवडून आपला सेवायोजन नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक व पासवर्ड वापरून साईन इन करा. ४. आपल्या होम पेजवरील Job Fair हा पर्याय निवडा. ५. District मध्ये Akola जिल्हा निवडून Filter बटनवर क्लिक करा नंतर दिनांकीत मेळावा निर्दनास येईल. त्यासमोर असलेलया Action बटनाच्या खाली View व Apply बटन दिसेल. ६. तद्नतंतर मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदांबाबत माहिती दिसेल. आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करुन Apply बटनवर क्लिक करा. । Agree हा पर्याय निवडा. ७. शेवटी Successfully Applied for the Job असा दिसेल अशा रितीने आपण ऑनलाईन सहभाग नोंदवू शकता. दि. १८ जून २०२५ रोजी जास्तीत जास्त नोकरी इच्छूक उमेदवारांनी आपले शैक्षणीक कागदपत्रे- बायोडाटा तसेच पासपोर्ट साईज फोटो सह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, अकोला येथे स्वखर्चाने उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा. तसेच याबाबत अडचण आल्यास या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०७२४२४३३८४९ किंवा २०२४२४१०९८, ८९८३४१९७९९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा