चला घडवूया विकसित महाराष्ट्र! 'विकसित महाराष्ट्र २०४७ : महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट'; गावोगाव सर्वेक्षण; नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार महाराष्ट्राचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्यासाठी योगदान द्यावे -जिल्हाधिकारी अजित कुंभार

 

चला घडवूया विकसित महाराष्ट्र!

'विकसित महाराष्ट्र २०४७ : महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट'; गावोगाव सर्वेक्षण; नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार

महाराष्ट्राचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’

तयार करण्यासाठी योगदान द्यावे

-जिल्हाधिकारी अजित कुंभार

 

अकोला, दि. २७ : ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ अंतर्गत राज्याच्या विकासाबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया व सहभाग मिळविण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी त्यात सहभाग घेऊन 'विकसित महाराष्ट्र २०४७ : महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट' निर्माण होण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

विकसित महाराष्ट्राची रुपरेषा ठरविण्यासाठी राज्यभर सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सामान्य नागरिकांचा सहभाग त्यात महत्वाचा आहे. ग्रामसेवक, आशा कार्यकर्ता, अंगणवाडी सेविका, विविध माध्यमे यांच्या माध्यमातून  गावोगाव याबाबत जनजागृती होत आहे.

'विकसित महाराष्ट्र २०४७ : महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट'मध्ये नागरिकांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब असेल. त्यासाठी नागरिकांच्या समस्या, शासनाकडून असलेल्या अपेक्षा त्यांच्याकडून जाणून घेण्यात येणार आहेत. गावोगाव हे सर्वेक्षण होणार आहे.

अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी या महत्वपूर्ण सर्वेक्षणात माहिती, प्रतिक्रिया नोंदवून परिपूर्ण व्हिजन डॉक्युमेंट निर्माण होण्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा